testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हिप्सची चरबी कमी करण्यासाठी उपाय

गुडघे आणि भुजांच्या पुढील भागावर शरीर टेकवा. उजवा पाय गुडघ्यापासून मोडा, पंजा वर करून प्वाइंट करत ठेवा. पाय जितका शक्य असेल तेवढा वर उचलून खाली आणा. पाठ अगदी सरळ असू द्या. तीस सेकंदापर्यंत ही क्रिया करा. पाय बदलून पुन्हा करा.

गुडघे मोडून पाठीवर लेटून जा. हिप्सच्या रुंदीप्रमाणे पायांमध्ये जागा ठेवा. हात दोन्ही बाजूला सरळ ठेवा हाताचे तळवे जमिनीवर. हिप्स संकुचित करून जमिनीपेक्षा जरा वरच्या बाजूला उचला. जमिनीवर डोके, खांदे आणि पायांचा जोर टाकून ही क्रिया करा. एक सेकंद अश्याच स्थिती राहा. हळू-हळू हिप्स पुन्हा जमिनीला टेकवा. ही क्रिया पाचदा करा.

टिप: हे व्यायाम सामान्य असले तरी शरीराला कोणत्याही प्रकाराची व्याधी किंवा दुखणे असल्यास व्यायाम करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


यावर अधिक वाचा :