शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

ओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी सोपे उपाय

सगळ्यांना आपले ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे सुंदर हवे हवेसे वाटतात, परंतू अनेक लोकं ओठांच्या काळपटपणामुळे परेशान राहतात. लिप बाम आणि मॉइस्चराइजर ओठांना नमी तर देतं परंतू काळपटपणा काही दूर होत नाही. हे सोपे उपाय अमलात आणून गुलाबी ओठ मिळवू शकता:
दूध आणि केसर
कच्च्या दुधात केसर मिसळा आणि ओठांवर चोळा. दररोज ही प्रक्रिया अमलात आणल्यास काळपटपणा दूर होईल.
 
मध
जरासं मध आपल्या बोटावर घेऊन हळू-हळू ओठांवर चोळा. दिवसातून दोनदा ही प्रक्रिया अमलात आणा.

लिंबू
त्वचेला उजळ करण्यासाठी लिंबू वापरला जातो, त्याच प्रकारे लिंबू ओठांची सुंदरता वाढवण्यात मदत करतं. पिळलेला लिंबू सकाळ- संध्याकाळ ओठांवर चोळल्याने काळपटपणा दूर होतो.
 
गुलाबाची पाने आणि ग्लिसरीन
गुलाबाची पाने बारीक वाटून त्यात जरा ग्लिसरीन मिसळून द्या, आता हे लेप रात्री झोपताना ओठांवर लावून घ्या, सकाळी उठल्यावर धुऊन टाका. नियमित वापरल्याने ओठांचा रंग गुलाबी आणि चमकदार होती.

डाळिंबाचे रस
झोपण्यापूर्वी डाळिंबाच्या रसात कापसाचा बोळा बुडवून ओठांवर लावावा. डाळिंबाच्या ‍ब्लीचिंगने ओठ स्वच्छ होतील.
 
बिटाचे ज्यूस
बिटामध्ये गडद जांभळ्या रंगाचे घटक आढळतात जे काळपटपणा दूर करण्यात मदत करतं.
साखर आणि लोणी
साखर ओठांवरील मृत त्वचेपासून सुटकारा दिलवण्यात तर लोणी रंगत वाढवण्यात मदत करतं. दोन चमचे लोण्यासोबत तीन चमचे साखर मिसळून आपल्या ओठांवर लावा.