शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

अंडरआर्म काळपट झाले असल्यास

बेकिंग सोडा अंडर आर्म्सला उजळ बनवण्यास आणि त्यांना हाइड्रेट ठेवण्यात मदत करतं. यामागील अनेक कारणं आहेत. हे अंडर आर्म घामापासून मुक्त आणि निरोगी ठेवतं. तर जाणून याने कशाप्रकारे अंडर आर्म उजळ होण्यास मदत मिळते:
बेकिंग सोडा त्वचेची एल्कलाइन प्रवृत्ती संपवतं आणि त्वचेचं पीएच लेवल संतुलित करतं.
बेकिंग सोडा त्वचेला एक्सफोलियेट करतं आणि मृत त्वचा पेशींना हटवतं.
बेकिंग सोड्यात त्वचा उजळ करण्यासाठी नैसर्गिक गुण आढळतात. हे मेलेनि‍नचे उत्पादन कमी करतं.
रोम छिद्र खोलण्यात सहायक असतात अ आणि त्वचेद्वारे स्त्रावित अतिरिक्त तेल शोषून घेतं.
बेकिंग सोडा शरीराची दुर्गंध दूर करतं आणि त्वचेला निरोगी ठेवतं.
 
अंडर आर्म उजळ करण्यासाठी असे वापरा बेकिंग सोडा-

अंडर आर्म उजळ करण्यासाठी असे वापरा बेकिंग सोडा:
बेकिंग सोडा आणि लिंबू
दोन चमचे बेकिंग सोड्यात जरासं लिंबू पिळून मिसळा. या पेस्टने 15 मिनिटापर्यंत हळुवार मालीश करा नंतर गार पाण्याने धुऊन टाका. अंडरआर्म उजळ करण्यासाठी दिवसातून दोनदा हा उपाय अमलात आणा. याने दुर्गंधही दूर होईल.
बेकिंग सोडा आणि काकडी
बेकिंग सोडा आणि काकडी दोन्ही मृत त्वचा सोप्यारित्या काढतं. हे मिश्रण त्वचेला नैसर्गिकरित्या उजळ करतं. एका काकडीचं रस काढून त्यात बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण अंडर आर्म्सवर लावा. नंतर गार पाण्याने धुऊन टाका.

बेकिंग सोडा आणि नारळ पाणी
बेकिंग सोडा आणि नारळ पाणी नैसर्गिकरित्या स्क्रबप्रमाणे कार्य करतं ज्याने अंडर आर्म्स उजळ होतात. 2-3 चमचे बेकिंग सोड्यात जरासं नारळाचं तेल मिसळा. सर्व सामुग्री मिसळून अंडरआर्म्सवर लावा. काही वेळाने पाण्याने धुऊन टाका.
बेकिंग सोडा आणि व्हिटॅमिन इ ऑइल
अर्धा चमचा बेकिंग सोड्यात अर्धा चमचा कॉर्नस्टार्च आणि जरा व्हिटॅमिन इ ऑइल मिसळा. दोन्ही मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडर आर्म्सवर लावा. 30 मिनिटाने धुऊन टाका. असे दिवसातून दोनदा करा.

बेकिंग सोडा आणि ग्लिसरीन
त्वचेचा रंग डार्क असून खाज सुटण्याची समस्या असल्यास आपल्या ग्लिसरीनसोबत बेकिंग सोडा वापरायला हवा. दोन चमचे बेकिंग सोड्यात ग्लिसरीन मिसळा. हे मिश्रण अंडरआर्मवर लावा. काही वेळ तसेच राहू द्या नंतर गार पाण्याने धुऊन टाका.
 
बेकिंग सोडा आणि दूध
बेकिंग सोडा आणि दूध सम मात्रेत मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट अंडर आर्मवर 30 मिनिटापर्यंत राहू द्या नंतर गार पाण्याने धुऊन टाका.
बेकिंग सोडा आणि अॅप्पल व्हिनेगर
बेकिंग सोड्यात अॅप्पल व्हिनेगर मिसळून अंडर आर्म्सवर लावा. थोड्या वेळाने गार पाण्याने धुऊन टाका.