बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

'चिकबोन'ला सुंदर बनवण्यासाठी काही उपाय!

आम्ही सर्व इतके भाग्यवान नसतो की जन्मापासूनच आमचे चिकबोंस सुंदर असतात, पण जर काही उपाय केले तर त्यांना सुंदर बनवू शकतो. 

चेहऱ्यावर ब्लशरचा वापर करून त्यांच्यात उभार आणू शकतो. जे शेड योग्य असेल त्याचाच वापर केला पाहिजे. जास्त डार्क किंवा जास्त लाइट शेड वापरणे टाळावे. हे नेहमी मीडियम शेडचे असले पाहिजे.

ज्यांची त्वचा पेल असते, त्यांनी ब्रॉंजर वापरायला पाहिजे पण त्यासाठी फक्त शेड सिलेक्ट करून चालणार नाही, त्याला व्यवस्थितरीत्या लावतासुद्धा यायला पाहिजे. चिक्सच्या शेवटी आणि डोळ्यांच्या सुरवातीला शिमरी ब्लशचा वापर करावा. याने चेहरा हायलाइट होईल आणि चिक बोंस उभारून दिसतील.

तुमच्या चिकचा गोल भाग अ‍ॅपल म्हणून ओळखण्यात येतो, यावर ब्रश व्यवस्थित लावायला पाहिजे. मेकअप प्रॉडक्ट कुठे जास्त किंवा कुठे कमी नाही लावायला पाहिजे. ते एकसारखे असणे गरजेचे आहे. जो पर्यंत शक्य असेल त्याला नॅचरल लुक देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.