testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चेहर्‍यावर वापरत असाल लिंबू तर नक्की वाचा

आपण चेहर्‍यासाठी घरगुती पॅक तयार करत असाल तर त्यात लिंबू नक्की वापरत असाल. परंतू अनेकदा बघण्यात आले आहे की लिंबू वापरल्याने रॅशेज किंवा जळजळ सारख्या समस्या उद्भवतात. लिंबाची प्रकृती आम्लिक असल्यामुळे याने त्वचेवर विपरित परिणाम होतो. जर आपल्याला याने अॅलजी असेल तर लिंबू वापरणे टाळा.
अनेकदा चांगल्या परिणामासाठी लिंबाचा अधिक उपयोग केला जातो आणि परिणामस्वरूप त्वचेवर पांढरे डाग, किंवा सुरकुत्या दिसू लागतात. अनेकदा खाजही सुटायला लागते. लिंबात फोटोसिंथेसाइजिंग कंपाउंड असतात जे त्वचेला यूव्ही रेजप्रती संवेदनशील ठेवतात. ज्यामुळे चेहर्‍यावर पिग्मेंटेशन होऊ शकतं.

यापेक्षा सकाळी एक कप पाण्यात लिंबू पिळून पिऊन घ्या. याने शरीर डिटॉक्सीफाय होऊन जातं.
लिंबू वापरण्यापूर्वी हे लक्षात असू द्या:
आपल्याला लिंबू वापरण्यापूर्वी आपली त्वचा कसी आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर आपली त्वचा ड्राय किंवा फ्लॅकी आहे तर लिंबू वापरणे टाळा.
चेहर्‍यावर पुरळ, जखम असल्यास लिंबू वापरू नये, जळजळ होऊ शकते.
लिंबाने त्वचा हाईड्रेड होते म्हणून हे फायदेशीर आहे परंतू वापरण्यापूर्वी चेहरा मॉइस्चर करून घ्या.
लिंबाचा वापर करताना हात स्वच्छ असले पाहिजे. अस्वच्छतेमुळे संक्रमण होण्याची शक्यता असते.


यावर अधिक वाचा :