बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

न्यू इयर पार्टीत दिसा आकर्षक, जाणून घ्या 5 टिप्स

आपला न्यू इयर पार्टीचा प्लान तर ठरलाच असेल पण त्या दिवशी सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आम्ही देत आहोत सोप्या 5 टिपा:
* चेहरा आकर्षक दिसावा म्हणून आधी मॉइश्चराइजर लावा आणि प्रायमर लावल्यानंतर क्रिमी फाउंडेशन स्पंजच्या मदतीने चेहर्‍यावर एकसारखं अप्लाय करा. आता यावर कॉपॅक लावा. बेस तयार आहे.
 
* चेहर्‍याचे उभार हायलाइट करण्यासाठी न्यूड किंवा पीच शिमर कलर्स वापरा आणि ब्रशच्या मदतीने फिनिशिंग करा, जसे गालांना गोल, नाकाला सरळ ब्रश चालवत आणि फॉरहेड व चीनवर सामान्य.
 

* हल्ली आय मेकअप ट्रेडमध्ये आहे, म्हणून आपल्याला डोळ्यांसाठी काही वेगळे निवडावं लागेल. बेसिक आयशेडो लावू ग्लिटर कलर ने आयलाइन बनवा आणि त्यावर ब्लॅक आयलाइनर लावा ज्याने ब्लॅक लाइनरवर ग्लिटर लाइनर दिसून येईल. आता व्हाईट काजल लावल्यावर बेसिक आयशेडोचा एक कोट ब्रशच्या मदतीने डोळ्यांच्या खाली काजलप्रमाणे अप्लाय करा.
 
* आता लिप्सच्या आउटलाइनवर डार्क रेड किंवा ब्राउन कलर केल्यानंतर ब्रशच्या मदतीने त्यावर लिप कलर फिल करा ज्याने फिनिशिंग येईल. नंतर आपण हलकं वॅसलीन किंवा ग्लॉसही अप्लाय करू शकता.
 
* आता आपल्या ड्रेसप्रमाणे हेअरस्टाइल बनवा. नेहमी केस मोकळे सोडत असाल तर डिजाइनर वेणी बनवा. केस मोकळे सोडायचे असतील तर स्ट्रेट लुक द्या.