शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

डार्क आर्म्सपासून सुटकारा मिळविण्यासाठी लावा बटाट्याचा रस

शरीराचे काही भाग अधिक घासले जातात आणि त्यामुळे ते काळे पडतात, त्यातूनच एक म्हणजे अंडरआर्म्स. अंडरआर्म्स काळे असल्यास स्लीवलेस कपडे घालायला लाज वाटते. पण आता काळजी करण्याची काही गरज नाही कारण आम्ही आपल्याला शिकवत आहे नैसर्गिक ब्लीच बनवायला ज्याने आपण काळपटपणा दूर करू शकता.
कसं तयार करायचं ब्लीच
बटाटे सोलून, किसून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका कापडात टाकून त्यातून रस काढून घ्या. हा रस नैसर्गिक ब्लीचप्रमाणे काम करेल आणि अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करेल. 
आता या रसात लिंबाच्या रसाचे 5 थेंब टाकून मिक्स करा. लिंबात व्हिटॅमिन सी आढळतं आणि सायट्रिक अॅसिडही ज्याने डेड स्किन निघते आणि सुरकुत्या दूर होतात.
या मिश्रणात चिमूटभर हळद टाकणं विसरू नका. याने अंडरआर्म्समध्ये घाम फुटत नाही ज्याने संक्रमणापासून बचाव होतो. 
आता यात काकडीचा रस मिसळून घ्या. याने अंडरआर्म्समधून दुर्गंध येणार नाही. हे केवळ एक चमचा मिसळायचे आहे.
आता अंडरआर्म साध्या पाण्याने धुऊन टाका. आपण हलका साबणही वापरू शकता. नंतर स्वच्छ पुसून घ्या.
आता तयार केलेल्या मिश्रणात कापसाचा गोळा बुडवून आर्म्सवर लावा. हे 15 ते 20 मिनिटापर्यंत लावून ठेवा नंतर टॉवेल गरम पाण्यात बुडवून आर्म्स पुसून घ्या.
आता आर्म्स पूर्णपणे वाळल्यावर त्यावर गुलाबपाणी लावा. याने तो भाग टोन होईल आणि त्वचा नरम होईल.
शक्यतोर डिओ वापरू नका. आपल्या अती घाम फुटत असेल तर आपण कॉर्न स्टार्च वापरू शकता. याने तो भाग ड्राय राहील आणि दुर्गंध दूर होईल.
 
विशेष नोट: अंडरआर्मवर जखम किंवा इन्फेक्शन असल्यास हा प्रयोग टाळा. स्किनमध्ये कुठलीही समस्या नसल्यास काही महिन्यांपर्यंत रोज हे मिश्रण अप्लाय करा.