गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

आय मॅजिक....

आयशॅडो सिलेक्ट करताना डोळ्यांच्या रंगाचा निश्चित विचार करावा.

ND
डार्क ब्राऊन : तुमच्या डोळ्यांचा रंग डार्क ब्राऊन असेल, तर ब्रॉन्ज, कॉपर आणि ब्राऊन रंगाच्या आयशॅडोचा उपयोग करावा.

ND
ब्लॅक आईज : डोळ्यांचा रंग काळा असेल, तर तुम्ही कुठल्याही रंगाचे आयलायनर किंवा आयशॅडो वापरू शकता. ब्राऊन, चॉकलेटी किंवा सॉफ्ट गोल्ड शेडचे आयलायनर तुम्हाला अधिक चांगले दिसेल. आयशॅडोसाठी गोल्ड किंवा ग्रे रंग वापरावा.

ND
ब्ल्यू आईज : तुमच्या डोळ्यांचा रंग निळा असेल, तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या रंगापेक्षा जास्त डार्क शेडच्या आयशॅडोचा उपयोग केला पाहिजे. तुम्ही टरकॉईज, सिल्व्हर आणि फुशिया कलरच्या आयशॅडोचाही उपयोग करू शकता. स्मोकी इपेंक्टसाठी ब्लॅक रंगाच्या आयशॅडोचाही उपयोग करू शकता.

आयलायनर : डोळ्यांच्या मेकअपची सुरुवात आयलायनरने करावी.