गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

कुल कुल टिप्स

एप्रिल आणि मे म्हणजे प्रचंड उकाड्याचे महिने. उन्हाने शरीराची होणारी काहिली आणि घामाचा चिकचिकाट यामुळे जीव अगदी नकोसा होतो. उन्हाळ्यात आपले आरोग्य आणि त्याचबरोबर सौंदर्य राखणे अशी दुहेरी कसरत करावी लागते. तुमची ही कसरत कमी करण्यासाठी या काही टिप्स :

घामाच्या रूपाने शरीरातले पाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर टाकले जाते. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यावे. वेगवेगळी सरबपते, हर्बल टी अशा स्वरूपातही द्रवपदार्त आहारात घेता येतील. शरीरातील घातक, टाकाऊ गटक बाहेर टाकण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते.

WD
बाहेर जाताना टोपी, स्कार्फ, रुमाल ओढणी यांनी डोकं झाकून घ्या. त्यामुळे उन्हाच्या थेट तडाख्यापासून डोक्याचे आणि केसांचे संरक्षण होईल.

एखादा ताजा व्रण किंवा जखम झाली असेल, तर ती झाकून ठेवा. कडक उन्हामुळे हा व्रण बरा होण्यास अडचण येऊ शकते.

जीवनसत्व 'क'युक्त क्रीम, लोशन्स यांचा वापर केल्याने सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून संरक्षण होते.

WD
उन्हाळ्यात वापरण्याचे मॉइश्चरायझर 'ऑईल फ्री' असावे. ते चेहर्‍याला लावल्यावर हलके वाटायला हवे.

हातावर, मानेवर तसेच शरीराच्या इतर उघड्या भागावरही सनस्क्रीन लावावे. हात कायमच उघडे असल्याने त्यांच्यावरही प्रखर सूर्यप्रकाशाचा वाईट परिणाम होऊ शकतो.

वार्धक्याची पहिली लक्षणे दिसतात ती हातावरच. म्हणूनच, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन मस्ट!