शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

केसांसाठी स्टायलिश हेअर स्प्रे

वेगवेगळी सेटिंग जेल, क्रीम्स लावून दीर्घकाळ केस व्यवस्थित ठेवण्याचे उपाय योजले जातात. याच प्रयत्नात 'हेअर स्प्रे'ला प्राधान्य दिलं जातंय. झटपट हेअर स्टाईलसाठी हा उत्तम पर्याय आहे.

कुरळ्या केसांपासून कोणत्याही आकर्षक हेअर स्टाईलमध्ये हेअर स्प्रेचा वापर लक्षवेधी ठरतो.

महिला केसांना बाऊन्सी लूक देण्यासाठी हेअर स्प्रेचा वापर करतात. नैसर्गिक चमक देण्यासाठी ब्लो ड्रायनंतर हेअर ब्रश किंवा कंगव्यावर हेअर स्प्रे मारून केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत केस विंचरा. रोल करून त्यावर स्प्रे मारल्यास केस नीट सेट होतात शिवाय केसांना वेगळीच चमक येते.

कुरळे केस निस्तेज दिसू नयेत, यासाठी ग्लिसरिनयुक्त स्प्रेचा वापर करावा. चांगल्या प्रतीच्या हेअर स्प्रेच्या वापराने केस कधीच चिपचिपीत होत नाहीत. हेअर स्प्रेमुळे केस चिपचिपीत होत असतील तर हेअर स्प्रे लगेच बदला. स्टाईलनुसार हेअर स्प्रेचा वापर करून दिवसभरासाठी केस सेट होऊ शकतात.