बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

गुलाब, चंदन आणि वाळा!

उन्हाळा म्हणजे घाम. या घामाच्या समस्येवर वाळा उपयुक्त आहे. वाळा पावडरची गुलाब पाण्यात पेस्ट करावी आणि सर्वांगाला लावावी. यामुळे घामाचा त्रास कमी होतो. त्वचेची जळजळही कमी होते.

आंघोळीच्या पाण्यात वाळा पावडर बांधलेली पुरचुंडी ठेवावी. हे सुगंधी स्नान मनाला ताजतवानं करते. त्वचेला थंडावा देते. 
 
उन्हाळ्यात शि‍तलता देण्यासाठी चंदनाचा उपयोग केला जातो. चंदनाच्या लेपाने त्वचेची आग कमी होते. 
 
अ‍ॅरोमा थेरेपीमध्ये मसाजसाठी चंदनाच्या तेलाचा वापर केला जातो. या तेलामुळे त्वचेचा पोत सुधारतो. मनावरील ताण कमी होतो. 
 
गुलाब पाकळ्यांची वस्त्रगाळ पावडरसुद्धा त्वचेसाठी उपयुक्त आहे. गुलाब पाकळ्यांमध्ये 'ई' आणि 'क' जीवनसत्व असते.