शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

घरच्या घरी सौंदर्य पॅक

सौंदर्यसाधनेत पॅकचे महत्त्व मोठे आहे. त्वचेला पोषण देणार्‍या पदार्थांचे लेप लावल्याने नैसर्गिक सौंदर्य टिकण्यास
मदत होते. काही उपयुक्त पॅक घरच्या घरी बनवता येतात.
 
१) दोन चमचे ज्वारीच्या पिठात एक चमचा मध, अर्धा चमचा दूध, अर्धा चमचा दही घालून लेप तयार करावा. यामुळे त्वचेतील रंगकणांचा गडदपणा कमी होतो.
 
२) दोन चमचे मैदा, अर्धा चमचा हायड्रोजन पॅरॉक्साईड, एक चमचा आंबेहळद, दोन चमचे दूध, थोडी साय यांचे मिश्रण पॅक स्वरूपात लावल्यास तेलकटपणा कमी होऊन वर्ण उजळतो.
 
३) दोन चमचे ओटचे पीठ, एक चमचा मध, अर्धा चमचा दही, थोडी हळद एकत्र करून लावल्यास सैल त्वचा आवळली जाते. त्वचेत ताठरपणा येतो.
 
४) गव्हाचे पीठ चाळल्यानंतर उरणार्‍या कोंड्यात दही अथवा दूध मिसळून लावल्यास चांगले परिणाम मिळतात. हा लेप स्क्रबरसारखे काम करतो.