शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

चेहर्‍यावरील 'ग्लो'साठी घरगुती ब्युटी फेस पॅक

ऊन्हामुळे सावळी झालेली त्वचा पुन्हा उजळविण्यासाठी नारळ पाणी, कच्चं दूध, काकडीचं रस, लिंबाचं रस, बेसन आणि थोडीशी चंदन पावडर मिसळून उटने तयार करा. हे अंघोळीच्या एका तासाआधी लावा. आठवड्यातून दोनदा हे वापरा. याने त्वचा उजळ होईल.
 
जर चेहर्‍यावर कांजिण्या किंवा पिंपल्सचे डाग असतील तर दोन बदाम उगाळून त्यात दोन चमचे दूध आणि एक चमचा संत्र्याच्या सालांचे चूर्ण मिसळून हळुवार चेहर्‍यावर स्क्रब करा आणि नंतर धुऊन टाका.
 
मधात केसर मिसळून याला डोळ्याखालील डॉर्क सर्कल्सवर लावा. याव्यतिरिक्त डोळ्याखाली एरंडेल तेल लावण्यानेदेखील काळे डाग कमी होतात.
 
बटाट्याचा रस डोळ्याच्या आजूबाजूला लावल्याने डॉर्क सर्कल्स नाहीसे होतात.