बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 11 जानेवारी 2016 (14:15 IST)

त्वचेला उजळ बनवण्यासाठी करा मिंट (पुदिना)चा फेस पॅक

मिंटचा स्वाद मसालेदार असून थोडं तिखट देखील असतो. या लहान हर्ब (जडी बूटी)मध्ये बरेच औषधीय गुण असतात आणि किमान प्रत्येक व्यंजनात याचा वापर केला जातो. बर्‍याच वर्षांपासून विशेषज्ञ सौंदर्य उत्पादांमध्ये मिंटचा वापर करण्याचा सल्ला देत आहे कारण याने त्वचेत सुधारणा होते. मिंटचा ज्यूस केसांसाठी देखील फार स्वास्थ्यप्रद्र आहे. मिंट फेस पॅकचा प्रयोग महिन्यातून किमान दोन वेळा करायला पाहिजे.  
 
साहित्य: मिंटचे पानं – 200 ग्रॅम (पेस्ट), खीरा – 1(पेस्ट), ग्रीन टी – 1 कप, दही – 3 टेबलस्पून, लिंबू – 1(रस). एका वाटीत मिंटच्या पानांची पेस्ट घ्या. त्यात खीरेची पेस्ट आणि दही मिसळा. आता या मिश्रणात लिंबाचा रस टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा. याला 20 मिनिटापर्यंत गार जागेवर ठेवा.   
 
उपयोग करण्याची विधी : गार पाण्याने चेहरा चांगल्या प्रकारे धुवा. चेहरा धुऊन हलक्या हाताने वाळवा. आता मिंट पॅकला चेहर्‍यावर लावा. आधी एक परत लावा, ती वाळल्यानंतर दुसरी परत लावून त्याला वाळू द्या. 20 मिनिटापर्यंत लावून ठेवा.  
 
जेव्हा पॅक पूर्णपणे वाळेल तेव्हा त्याला ओढून काढण्याचा प्रयत्न करा. पॅक काढल्यानंतर कोमट ग्रीन टीने चेहरा धुऊन घ्या. यानंतर चेहरा पुसू नका, ग्रीन टीला त्वचेवर वाळू द्या. 20 मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुऊन टाका. त्वचेच्या उजळपणेसाठी महिन्यातून दोन वेळा  मिंट पॅकचा वापर करा. हा पॅक त्वचेच्या संक्रमणाला दूर ठेवतो. त्वचेला उजळ बनवण्यासाठी हा एक सर्वोत्तम हर्ब आहे.