गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

बाहूंची सुंदरता टिकवण्यासाठी सोपे उपाय

WD
महिला बाहूंकडे हवे तसे लक्ष देत नाहीत. सौंदर्य खुलविणार्‍या अवयवांपैकी तोही एक आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. बाहूंचे रखरखीत असल्यास चांगले दिसत नाहीत. त्यामुळे ते मुलायम करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलने मॉलिश केली पाहिजे. टोमॅटोचा रस, लिंबूचा रस आणि कच्चे दूध एकत्र करून त्याचे मिश्रण बाहूंवर चोळले पाहिजे. त्यामुळे बाहूंचा रंग उजळेल. बाहू पातळ असतील तर बदामाच्या तेलाने मॉलिश करा. बाहू मोठे असतील तरीही मॉलिश फायदेशीर ठरेल. मॉलिश केल्याने अतिरिक्त चरबी कमी होते शिवाय रक्ताभिसरण योग्य होते.

सुडौल, पातळ आणि लांब बाहू अतिशय सुंदर दिसतात. जाड, थुलथुलीत बाहू संपूर्ण सौंदर्यावर बोळा फिरवतात. सुडौल शरीर सौंदर्य वाढवते, तसेच बाहूंचेही आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

बाहूंची सुंदरता टिकवण्यात काखेचे स्थानही महत्त्वाचे असते. पण हा भाग नेहमी सौंदर्य जपण्यात उपेक्षित रहातो. येथे मळ साचून त्वचा कोरडी होते. त्यामुळे अंघोळ करण्यापूर्वी साबणाचा फेस करून त्यात सरसोचे तेल टाकून काख चांगली रगडायला हवी. त्यानंतर थोडा वेळ थांबा. मग तीळाने पुन्हा रगडा. बघा, चार पाच दिवसांत काख स्वच्छ व मुलायम होईल. याशिवाय एका मोठ्या लिंबूचे दोन भाग करून काखेवर दहा मिनिटे रगडा. त्यामुळेसुद्धा काख स्वच्छ होईल. यानंतर काखेत मॉयश्चरायझर लावा.

काखेच्या सौंदर्यासाठी केस साफ करणेही जरूरीचे आहे. बाहू आणि बगलांच्या सफाईसाठी तेथील केस वॅक्सिंगने काढून टाकावेत. घामापासून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी डिओड्रंटचा वापर करा. ग्लिसरिन, लिंबू आणि गुलाबाचे पाणी एकत्रित करा रात्री झोपताना पूर्ण बाहूंवर ते लावा. त्यामुळे रंगही उजळेल व त्वचाचा कोरडेपणाही कमी होईल.

तुम्ही स्लिवलेस घालत असाल तर बाहूंच्या सुडौलतेकडे वर विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी तुम्ही नृत्य करा. पोहणे, बॅडमिंटन खेळणे हेही फायदेशीर ठरू शकते. याशिवाय काही नियमित व्यायाम तुमच्या मदतीला येऊ शकतात. उदाहरणार्थ

१. सरळ उभे राहून बाहू समोरच्या दिशेने पसरवा. डोक्यावरून वर नेत त्यांना गोल फिरवा. असे दोन्ही बाहूंच्या बाबतीत दहा दहा वेळा करा.

२. जमिनीवर बसा. दळण जसे दळतात तसे किंवा दही जसे घुसळतात तशा प्रकारे हाताची हालचाल करा. नियमितपणे असे पंधरा मिनिटे केल्यास बाहूंचा थुलथुलीतपणा कमी होऊन तुमचे बाहू सुंदल, सुडौल होतील.