शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

ब्लॅक हेड्‍सच्या समस्या

आपल्या नाजूक त्वचेवर अनेकदा काळे डाग पडतात. त्यालाच ब्लॅक हेड्‍स म्हणतात. या डागांमुळे आपल्याला मान खाली घालून रहावे लागते. विशेषतः कार्यक्रमात इतरांच्या नजरा चुकवत रहावे लागते. चेहर्‍यावर अथवा हातापायावर काळे डाग दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यावर वेळीच उपचार करून तुमची स्वत:ची सुटका करून घेऊ शकता.

ब्लॅक हेड्स होण्याची कारणे
तेलकट त्वचा असल्याने धूळ चेहर्‍यावर बसते. त्यामुळे चेहर्‍यावर काळे डाग पडण्यास प्रारंभ होतो. त्याला आपण ब्लॅक हेड्स म्हणतो.

जरा हे करून पहा -
1) सगळ्यात आधी पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर चेहर्‍यावर हलक्या हाताने मसाज करा. स्क्रबचा प्रयोग केल्याने चेहर्‍यावरील तेलकटपणा कमी होतो.
2) घराच्या बाहेर पडताना चेहर्‍यावर मॉइस्चराइज़रचा उपयोग जरूर करा.
3) एक मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा, उकळत्या पाणीची वाफ चेहर्‍यावर घेतल्याने ब्लॅक हेड्स घालवता येऊ शकतात. ब्लॅक हेड्सपासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
4) ब्लॅक हेड्स स्ट्रीप केल्याने सहज दूर होतात.
5) ब्लॅक हेड्सवर वारंवार हाताची बोटे फिरवू नये. तसे केल्याने ते चेहर्‍यावर पसरण्याची शक्यता असते.
6) त्वचा चांगली राहावी म्हणून टोनर, क्लीनर व मॉइश्चरायजर्स नियमित लावले पाहिजे. त्यात तेही ब्रॅंडेड पाहिजेत.
7) दिवसभरात भरपूर पाणी प्यायले पाहिजे. जेणेकरून पोट साफ रहाते.
8) तेल व मसालेयुक्त पदार्थाचे जास्त सेवन केल्याने त्याचा त्वचेवर विपरित परिणाम होतो.
9) नियमित व्यायाम व संतुलित आहार घेतल्याने चेहर्‍यावर तेज येते. त्वचेचा रंग खुलतो.