शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

सुपर फ्रूट्सचा कमाल!

फळांचे सेवन करणे तर नेहमीच फायदेशीर असतं, ही गोष्ट चिकित्सकांपासून घरातील मोठी मंडळी नेहमीच सांगत असते. शोधकर्त्यांनी काही अशा फळांची यादी तयार केली आहे जे फायदा पोहोचण्याच्या क्रमात सर्वात पुढे आहेत. आणि याच फळांना 'सुपर फ्रूट्स'चे नाव देण्यात आले आहे. ज्या फळांमध्ये एंटऑक्सीडेंटस तत्त्व (म्हणजे व्हिटॅमिन्स आणि लोह पदार्थ) आणि एंजाइम्स भरपूर मात्रेत असतात अशा फळांना या श्रेणीत ठेवले आहे. हे फळांमध्ये हृदय रोग, पर्किन्सन, अल्जाइमर आणि कर्क रोगांशी लढण्याची भरपूर ताकद असते. यात सर्वात पहिल्या नंबर वर आहे द्राक्ष आणि बऱ्याच प्रकारची बेरीज (स्ट्रॉबेरी, रेस्पबेरी, जांभूळ) आणि चेरी सारखे फळं. 

ज्या फळांचे रंग जितके अधीक डार्क असतात त्यांच्यात एंटीऑक्सिडेंटसची मात्रा जास्त प्रमाणात असते. संत्री, डाळिंब, आंबा, किवी, आलूबुखारा आणि अननस याच श्रेणीत येतात. हे सर्वच सुपर फ्रूट्स आहेत. तर मग आता आजपासूनच आपल्या आहारात या फळांचा समावेश करणे सुरू करा आणि चमत्कार बघा.