शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्य

WD
फॅशनची व्याख्या बदलू शकते पण आरोग्याची व्याख्या मात्र बदलत नसते. बदलून चालतही नाही. सध्याच्या दिवसांत सौंदर्यप्रसाधने आणि फॅशनच्या बाबतीत प्रत्येकाने विशेषतः महिलांनी त्यांची निवड करताना अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी. खरं म्हणजे प्रसाधनं ही सौंदर्यवृद्धीसाठी तयार केलेली असतात. पण जर कोणी त्यांचे दुष्परिणाम काय होतात हे जर लक्षात घेतलं नाही, तर सौंदर्याऐवजी त्या प्रसाधनांपासून त्रासच होईल.प्रामुख्याने...

हेअर डाय: आकर्षक आणि तरुण दिसण्यासाठी कलप वापरणारी कितीतरी माणसं असतात. या कलपांमध्ये फेनिल-अलानाईन-डायमाईन नावाचं द्रव्य वापरलं जातं. असे कलप वापरल्यानं चेहरा सुजणं, लाल होणं, तसंच टाळू, चेहरा आणि डोळ्यांची आग होणं अशा व्याधी सुरू होतात. मेंदी हा नैसर्गिक कलप असून अत्यंत कमी धोकादायक आहे.

शाम्पूमुळे होणारा आजा


WD


शाम्पू : अनेक सुगंधी शाम्पूच्या सतत वापरानं डोक्याच्या त्वचेला गंभीर स्वरूपाचे अपाय होऊ शकतात. तसेच शाम्पूमुळे केसांची चमकही नाहीशी होत जाते. आणि केस गळायला लागतात.

साबणामुळे त्वचेत कोरडेपणा येतो


WD


साबण : बहुतेक सर्व साबणांमध्ये कॉस्टिक सोडा वापरलेला असतो. विशेषतः औषधी साबणांमध्ये जंतुप्रतिबंधक द्रव्ये वापरलेली असतात. या द्रव्यांमुळे त्वचेला कोरडेपणा येतो. त्यातून पुढं त्वचेचे विविध विकार उद्भवू शकतात.

पुढे पहा केसांचे सुगंधी तेल


WD


केसांचे सुगंधी तेल : जर कुणाला सुगंधी द्रव्यांची अ‍ॅलर्जी असेल, तर त्यांनी सुगंधी तेल न वापरणंच इष्ट असतं. कित्येकांना अशी तेलं वापरल्यानं डोकं जड होणं, दुखणं, अशी दुखणी सुरू होतात. आयुर्वेदिक साबण व सौम्य तेले विशेषतः खोबरेल तेल वापरणं हितकारक असतं.

कुंकूमुळे कोड होण्याची शक्यता असते


WD


कुंकू : ज्या रंगाची साडी त्याच रंगाची कुंकवाची टिकली कपाळावर हवीच, अशी हल्लीची फॅशन आहे. निरनिराळ्या रंगाचे कुमकुम हल्ली बाजारात मिळतात. त्यात अनिलाईन डाईन आणि मधमाशांचं मेण वापरलेले असते. अशा कुंकवांच्या वापरामुळे आगपेण आणि कोडसुद्धा होऊ शकत.

पुढे पहा मस्करा व आयशॅडोज


WD


मस्करा व आयशॅडोज : या प्रसाधनांमध्ये विविध धातूंचा उपयोग केला जात असल्यामुळं त्वचेचा रंग कायमचा बदलू शकतो. डागही पडू शकतात.

लिपस्टिक ही अपायकारक ठरू शकत

WD


लिपस्टिक : लिपस्टिकच्या वापरामुळं ओठ अत्यंत आकर्षक आणि आव्हानात्मक दिसतात. हे खरं असलं तरी काही जणींना यातील मेण आणि रंग अपायकारक ठरू शकतात.

पुढे पहा फेस पावडर व क्रीम


WD


फेस पावडर क्रीम : विविध प्रकारच्या फेस पावडरमध्ये क्रीम्स आणि फाऊंडेशन्समध्ये असे काही पदार्थ वापरलेले असतात की त्यांची अनेकांना अ‍ॅलर्जी असते. त्यामुळं त्वचा लाल होते. आग करणारे पुरळ उमटते तर कित्येकदा चेह-यावर चट्टेही पडतात.

जीवनसत्वांचा वापर


WD


जीवनसत्वांचा वापर : आपली प्रकृती तंदुरुस्त ठेवण्यासाठी जीवनसत्वयुक्त औषधांचा तात्पुरता वापर केला केला तर त्वचा ठीक राहतेही पण सततच्या वापरामुळं त्वचा कधीही दुरुस्त होऊ शकणार नाही इतकी खराब होऊ शकते.