गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

सौदर्य खुलविण्यासाठी सोपे उपाय

ND
कारल्याची साल चेहर्‍यावर चोळा. यामुळे पिंपल, ब्लॅकहेड निघण्यासाठी मदत होईल. हा उपाय साधारण तीन ते पाच दिवस करून पाहा. फरक जाणवेल.

दूध, चिमूटभर हळद आणि दोन-तीन तुळशीची पानं यांची पेस्ट काळवंडलेल्या हाताच्या कोपरांवर लावा. ही पेस्ट रात्री लावून ठेवा आणि सकाळी हात धुवा. सात दिवस हा उपाय करा, फायदा होईल.

संत्र, लिंबू आणि काकडीची सालं मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्या. ही पेस्ट फेसपॅक म्हणून वापरता येईल. कमीतकमी २० मिनिटं हा पॅक चेहर्‍यावर लावा. हा पॅक रोज लावता येईल. सतत काही दिवस हा उपाय करा. त्वचा चमकदार होईल.

हातापायांवरील व्रण, डाग घालवण्यासाठी लिंबाची साल त्यावर पाच ते सात मिनिटांसाठी चोळा. हा उपाय दिवसातून दोनदा असा कमीतकमी सात दिवस तरी करा. डाग कमी होतील.

चंदनाची पावडर आणि कच्चं दूध एकास तीन या प्रमाणात एकत्र करून तोंड आणि हातावर चोळा. १५ मिनिटांनी धुऊन टाका. हा उपाय साधारण दर दोन दिवसांनी करा. त्वचा चमकदार होईल.