Widgets Magazine
Widgets Magazine

नशीब पालटण्यासाठी तळहातावर प्लास्टिक सर्जरी

गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (15:43 IST)

chang the luck

बरीच मंडली आयुष्यातील आपले अपयश व कमनशिबाचा दोष तळहातावरील रेषांना देतात. असे  समज़ले जाते की, मनुष्याच्या तळ हातावरील रेषांद्वारे त्याच्या भविष्याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे आपल्या भविष्यात काय वाटून ठेवले आहे हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषबुवांची मदत घेतली जाते. 
 
विषय लग्नाचा असो वा नोकरीचा किंवा मग घराचा आपल्या भाग्यात काय असेल ते माहीत करण्यासाठी अनेकजण ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात. याच रेषांना व्यवस्थित करण्यासाठी जपानमध्ये एक नवा प्रयोग केला जात आहे. जापानी लोक आपले भाग्य, पैसा, यश, प्रसिद्धी आणि विवाहाशी निगडित रेषा अनुकूल करून घेण्यासाठी तळहातावर प्लास्टिक सर्जरी करून घेत आहेत.  अशा शस्त्रक्रियेवर सुमारे एक हजार डॉलर खर्च येतो.  इलेक्ट्रिकल स्कॅल्पेलच्या मदतीने अशा शस्त्रकिया केल्या जातात. या संपूर्ण प्रक्रियेसाठी १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागतो. 
 
टोकियोतील शोनान ब्यूटी क्लिनिकच्या शिंजुका शाखेमध्ये तळहातावर प्लास्टिक सर्जरी करणारी तकाकी माट्सुका सांगते की, या शस्त्रक्रियेसाठी लेजरचा वापर केला जात नाही. तळहातावरील रेषा बनविण्यासाठी लेजरचा वापर केल्यास त्या स्पष्ट उमटत्त नाहीत व लवकर मिटून जातात. तकाकीच्या  क्लिनिमध्ये आतापर्यंत ४० पेक्षा जास्त लोकांनी  पाम प्लास्टिक सर्जरी करून घेतली आहे. तिथे  अवध्या 10… १५ मिनिटांत हातावर ५ ते १0 रेषा बनवून दिल्या जातात.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

श्रद्धा -अंधश्रद्धा

news

कसे लोकं जातात नरकात?

चाणक्यने सांगितले आहे कसे लक्षण असलेले लोकं नरकात पडतात.

news

बेडखाली ठेवा एक ग्लास पाणी, पहा चमत्कार

काही मानसिक आजाराचे कारण कळून येत नाही. म्हणून अनेकदा यासाठी दिल्या जाणारी थॅरेपीचा ...

news

घराला वाईट शक्तीपासून वाचवण्यासाठी अमलात आणा हे 3 उपाय

अनेकदा आम्हाला भास होतो की घरात काही विचित्र शक्तींचा वास आहे. यापासून वाचण्यासाठी हे 3 ...

news

पर्समध्ये मुळीच ठेवू नये या 7 वस्तू, होऊ शकतो धन अभाव

अधिकश्या आमचा पर्स फालतू वस्तूंनी भरलेला असतो. आळशीपणामुळे आम्ही पर्स स्वच्छ करत नाही आणि ...

Widgets Magazine