शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

काळी शाल आणि गणेश भाईंचा इलाज

अनेक प्रकारच्या विभूती किंवा औषधोपचाराने उपाय करणार्‍यांविषयी आपण आतापर्यंत एकले असेल, पण केवळ अंगावर पांघरायच्या शालीने कोणत्या रोगाचा इलाज करता येणे शक्य असल्याचे आपण कधी ऐकलं आहे का?

नाही ना? आज श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आमच्या या भागात आम्ही आपल्याला काळ्या शालीने रोग दूर पळवणार्‍या गणेश भाईंविषयी माहिती देणार आहोत.

मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर जिल्हयात बडगाव नावाच्या गावात हे गणेश भाई रहातात. आपल्याला देवीचे वरदान मिळाल्याचा त्यांचा दावा आहे. काळी शाल पांघरुन आणि रोग्याला प्रसाद म्हणून मार देऊन त्याचा रोग बरा केला जाऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.

WD
डायबेटीस, कॅन्सर, पोलियो, पॅरालिसीस यासह एड्स सारख्या महाभयंकर रोगाचा इलाज करण्याचा गणेश भाईंचा दावा आहे. त्यांच्या या दाव्यामुळे त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांची संख्याही अधिक आहे.

अनेक भक्त तर इलाजासाठी तासंतास रांगेत थांबत असल्याने पोलिस बंदोबस्तात त्यांचा इलाज केला जातोय.

WD
बाबा किंवा महाराज अशी हाक मारलेली गणेश भाईंना मुळीच आवडत नाही. आपण नेमका काय इलाज करतो ते आपल्यालाही कळत नसून केवळ देवीची आपल्यावर कृपा असल्याने आपल्याकडे आलेला रुग्ण बरा होत असल्याचे गणेश भाईंचे म्हणणे आहे.

गणेश भाईंच्या या चमत्कारीक उपचार पद्धतीने प्रभावित झालेल्या एका भाविकाने त्यांना 12 एकरची जमिन दिली असून, येथे लवकरच देवीचे मंदीर बांधण्यात येणार आहे.

विज्ञानयुगात शालीने असा कोणता रोग खरंच बरा होऊ शकतो का? का गणेश भाई पोलिस आणि प्रशासनाच्या मर्जीनेच लोकांच्या भावनांशी खेळत आहेत? आपल्याला काय वाटते ? आम्हाला जरुर कळवा.