शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Updated : शनिवार, 4 जुलै 2015 (10:28 IST)

धन लाभाचे संकेत देखील देते पाल, असे आहे शकुन-अपशकुन

प्रकृतीने भविष्यात होणार्‍या विभिन्न घटनांबद्दल मनुष्याला सचेत करण्यासाठी बरेच माध्यम बनवले आहेत. पशू-पक्षी व जीव-जंतू विभिन्न क्रिया-कलपांच्या माध्यमाने आम्हाला भविष्यात होणार्‍या घटनांबद्दल सचेत करतात. वर्तमानात या गोष्टींवर पूर्णपणे भरवसा करू शकत नाही, पण शकुन शास्त्रात पशू-पक्ष्यांपासून मिळणार्‍या संकेतांचे स्पष्ट वर्णन मिळतात.  
 
घरात वावरणारी पाल देखील भविष्यात होणार्‍या घटनांबद्दल संकेत करते. गरज आहे तर त्या संकेतांना जाणून घ्यायची. आपण बघूया पाल आम्हाला भविष्यातील येणार्‍या घटनांची माहिती कशी देते.  
 
1. पाल एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर प‍डली तर मान सन्मान मिळण्याची शक्यता असते पण डाव्या हातावर पडल्याने धनहानी होऊ शकते.    
 
2. जर पाल एखाद्या व्यक्तीच्या उजवीकडून डावीकडे उतरेल तर त्या व्यक्तीचे प्रमोशन आणि धन लाभ होण्याचे योग बनतात.  
 
3. नवीन घरात प्रवेश करताना जर घर मालकाला मेलेली पाल दिसली तर त्या घरात राहणार्‍या लोकांना आजारपणाची भिती राहते. 
4. शकुन शास्त्रानुसार दिवसा जेवण करताना जर पालीचे बोलणे ऐकू आले तर लवकरच शुभ बातमी मिळू शकते.
 
5. स्त्रीच्या डाव्या बाजूवर पाल पडली तर सौभाग्यात वृद्धी आणि उजव्या बाजूवर पडली तर एखादी अशुभ बातमी मिळण्याची शक्यता असते.
 
6. जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर पाल पडली तर त्याला सुख-सुविधा मिळतात.
 
7. डाव्या गालावर पाल पडली तर आरोग्याशी निगडित तक्रार राहते.

8. शास्त्रात लिहिले आहे. या अपशकुनापासून बचाव करण्यासाठी पूर्ण विधी-विधानाने पूजा करूनच नवीन घरात प्रवेश केले पाहिजे.
 
9. जर पाल गुप्तांगावर पडली तर त्या व्यक्तीला एखादा आजार होण्याची शक्यता असते.  
 
10. जर पाली समागम करताना दिसल्या तर जुन्या मित्राची भेट होते.