शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

1 जुलैपासून दूध 2 रुपांनी महागणार

मुंबई- राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांचे हित जोपासण्याच्यादृष्टीने शासकीय दूध योजनेमार्फत खरेदी करण्यात येणार्‍या गाय व म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. ही दरवाढ येत्या 1 जुलैपासून लागू होणार आहे. 
 
राज्यातील शासकीय दूध योजनांमारर्फत खरेदी करण्यात येत असलेल्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याबाबत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रदत्त समिती गठीत करण्यात आली होती. राज्यातील सद्यस्थितीतील दूध खरेदी दर, उत्पादन खर्च या बाबींचा विचार करून समितीने केलेल्या दूध खरेदी दरवाढीच्या शिफारशीला मुख्यमंर्त्यांनी मान्यता दिली.
 
या निर्णयामुळे गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली असून शासकीय दूध योजनेमध्ये संकलित होणार्‍या गायीच्या दुधासाठी खरेदी दर आता 20 वरून 22 रुपये एवढा करण्यात आला आहे. तर म्हशीच्या दुधाचा खरेदी दर आता 29 वरून 31 रूपये इतका झाला आहे. या दरवाढीमुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढीव दराप्रमाणे गायीचे दूध 35 रुपये प्रतिलिटर तर म्हशीचे 44 रुपये प्रतिलिटर या दराने विक्री करण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आला आहे.