Widgets Magazine
Widgets Magazine

आधारकार्ड अभ्यासासाठी 9 सदस्यांचे घटनापीठ

मंगळवार, 18 जुलै 2017 (17:02 IST)

आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणं हे व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे का हे जाणून घेण्यासाठी 9 सदस्यांचं घटनापीठ दोन दिवस सर्व बाजू जाणून घेण्याचा प्रय़त्न करणार आहे.  यापुर्वी पाच न्यायाधीशांचं खंडपीठ या प्रकरणी सुनावणी करणार होतं. मात्र,  न्यायालयाने  हे प्रकरण 9 सदस्यीय घटनापीठाकडे सुपूर्द केलं. 

इन्कम टॅक्स रिटर्न नियमांच्या बदलासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना जारी करत आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणं अनिवार्य केलं होतं. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावरील सुनावणी दरम्यान, ‘आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक केल्यास कुणाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन होईल का? असा सवाल आज सुप्रीम कोर्टानं सवाल उपस्थित केला. त्यामुळे खरंच आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणं हे व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे का हे जाणून  हेच जाणून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टानं नऊ सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण सुपूर्द केलं आहे.
 
‘आधार’ हे ऐच्छिक असेल, असे ‘आधार’ कायदा सांगतो. असे असूनही सरकार विविध योजनांचे लाभ देण्यासाठी ‘आधार’ची सक्ती करू शकते का, हा मुद्दाही सुनावणीसाठी असेल. त्यामुळे ‘आधार’ची सक्ती आणि ‘आधार’मुळे खासगी बाबींमध्ये होणारा कथित हस्तक्षेप, अशा दोन प्रमुख मुद्द्यांवर सुनावणी अपेक्षित आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ

खरीप हंगामात राज्यातील सर्व जिल्हयांत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय ...

news

किरकोळ किंमतीवरील महागाई नियंत्रणात

महागाई रोखण्यात सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेला आता चांगलेच यश आले आहे. मात्र औद्योगिक ...

news

वॉलमार्ट इंडियाची 900 कोटीची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासनाच्या उद्योग विभाग आणि वॉलमार्ट ...

news

नॅशलन स्टॉक एक्सचेंजचे ट्रेडिंग तीन तास बंद

मुंबईतील नॅशलन स्टॉक एक्सचेंजचं ट्रेडिंग तीन तासांच्या खोळंब्यानंतर सुरु झालं आहे. ...

Widgets Magazine