बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (08:17 IST)

बँकांची कामे पूर्ण करा आहेत पुढे चार सुट्ट्या

सना सुधीचा काळ सुरु होत आहे. त्यामुळे सुट्ट्या देखील सुरु होती. त्यामुळे आता या येत्या काही दिवसात सलग  चार दिवस बँका  बंद राहणार आहेत. यामध्ये आता फक्त  एका दिवसाच्या कामकाजानंतर पुन्हा सुटी आहे. त्यामुळे बँकांवर मोठा ताण निर्माण होणार आहे. त्याचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दि. १२  ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार असून आहे. नंतर दि. १३ रोजी रविवार आहे. त्यानंतर  १४ रोजी गोकुळाष्टमी सुट्टी आहे. तर  १५ आॅगस्टला स्वातंत्र्य दिन असे चार दिवस बॅँकांचे कामकाज बंद आहेत.   व्यापारी, व्यावसायिकांनी पुढच्या आठवड्यातील बॅँकिंग व्यवहार पूर्ण करण्यावर भर दिला आहे. १५ आॅगस्टच्या सुटीनंतर १६ रोजी कामकाजाचा दिवस असून, १७ आॅगस्टला पुन्हा पतेतीची सुटी राहणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला बँकेचे व्यवहार करयचे आहेत त्यांनी लवकर करावे.