testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘भीम’ऍपचा वापर 40 लाख नागरिक करतात

Last Modified बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (09:03 IST)
40 सुरुवातीच्या काही अडथळ्यावर मात करून भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजे भीम ऍपने जुलैअखेर मोठी मजल मारली आहे. भीमऍप आतापर्यंत 1.6 कोटी वेळा डाऊनलोड झाले असून 40 लाख नागरिक ते नियमित वापरू लागले आहेत. 30 डिसेंबर 2016 ला हे ऍप सरकारने पुढाकार घेऊन लॉंच केले होते, पण सुरुवातीला ते वापरण्यात अनेक अडचणी येत होत्या. आता त्याचे 1.3 व्हर्जन वापरात असून लवकरच 1.4 व्हर्जन लॉंच केले जाणार आहे.भीमचा वापर वाढावा म्हणून सरकारने त्याच्या व्यवहारांवर बक्षिसे ठेवली आहेत. त्यानुसार भीम वापरकर्ता जेव्हा दुसऱ्याला भीमची शिफारस करतो आणि दुसरा जेव्हा त्यावर तीन व्यवहार करतो तेव्हा शिफारस करणाऱ्यास 10 रुपये तर हे तीन व्यवहार प्रथम करणाऱ्यास 25 रुपये मिळतात. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (छउझख) ने रिझर्व्ह बॅंक आणि इंडियन बॅंक असोसिएशनच्या मदतीने हे ऍप तयार केले असून कोणत्याही बॅंकेतून कोणत्याही बॅंकेत अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल फोन वापरून पैशांचा व्यवहार करण्यास ते उपयुक्त आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठीच ते आल्यामुळे या व्यवहारात कोणतेही चार्जेस घेतले जात नाहीत.


यावर अधिक वाचा :