शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 31 मार्च 2017 (23:39 IST)

पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी कपात

पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर 3 रुपये 77 पैशांनी, डिझेल प्रतिलिटर 2 रुपये 91 पैशांनी स्वस्त झालं आहे. आज मध्यरात्रीपासून ही नवी दरवाढ लागू होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलची किंमत घसरल्यानं भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात केली आहे.
 
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड प्रत्येक महिन्याच्या एक आणि 16 तारखेला पेट्रोल व डिझेलच्या पंधरवड्यातील आंतरराष्ट्रीय बाजारातील सरासरी दरांचा आढावा घेऊन पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतील चढ-उतार जाहीर करते.
 
तत्पूर्वी 1 जानेवारी 2017ला पेट्रोल 1.29 रुपयांनी वाढले होते, तर डिझेल 97 पैशांनी महागले होते. त्यावेळी पेट्रोल एका महिन्यात तिसऱ्यांदा तर डिझेल पंधरवड्यात दुसऱ्यांदा वाढले होते.