testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एसएमएस दाखवा, वीजबील भरा

वीज बिलाबाबत महावितरणच्यावतीने ग्राहकांना मोबाईलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर भरण्याची सुविधा महावितरणनेराज्यभरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली असून त्याचा लाभ ग्राहकांनाहोणार आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ही सुविधा ग्राहकांना उपलब्धकरून दिली आहे.
राज्यभरातील सुमारे 1 कोटी 39 लाख वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईलक्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे.
या ग्राहकांना महावितरणच्यावीजबिलाचा तपशील एसएमएसद्वारे संबंधित मोबाईलवर पाठविण्यात येतो.या एसएमएसमध्ये ग्राहक क्रमांक, वीज बिलाची रक्कम तसेच वीजबीलभरण्याची अंतिम तारीख याचा समावेश असतो. अशा ग्राहकांनाआता मोबाईलवरील दाखवून महावितरणच्या वीजबील भरणाकेंद्रात वीजबील भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा महावितरणचा प्रयत्न असूनएसएमएसद्वारे ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.ग्राहकांनी महावितरणच्या कॉलसेंटर टोल फ्री क्र.18002003435/18002333435/19120 येथे तसेच महावितरणचे ऍ़पअथवमहावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in येथे मोबाईलक्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :