गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मे 2017 (11:58 IST)

GSTमुळे 1200 हून अधिक वस्तूंवरील दर कमी होणार

वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीअंतर्गत बहुतांश वस्तूंवरील करांच्या दरावर केंद्र आणि राज्यांमध्ये सहमती झाली आहे. दररोजच्या वापरातील वस्तूंवरील कराचे दर घटवण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण 1200 हून अधिक वस्तूंवरील जीएसटीचे दर प्रत्यक्षात कमी होतील. आता जो टॅक्स आकारला जातो, त्यापैकी कोणत्याही वस्तूवरील कर वाढलेला नाही, उलट कमी झाला आहे. यामुळे करचोरीला आळा बसेल, असं अरुण जेटली यांनी सांगितलं.नव्या कर रचनेनुसार, अनेक वस्तूंच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. दूध आणि अन्नधान्य करमुक्त करण्यात आलं आहे. शिवाय प्रोसेस्ड फूडही स्वस्त होणार आहे.