Widgets Magazine

जीएसटीसाठी ७ मे ऐवजी २०, २१ आणि २२ ला विशेष अधिवेशन

Last Modified मंगळवार, 2 मे 2017 (16:33 IST)

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीसाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन नियोजित केले आहे. १७ मे रोजी होणाऱ्या अधिवेशनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

आता १७ मे ऐवजी २०,
२१ आणि २२
मे रोजी होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याविषयी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली. १८ आणि १९ मे रोजी श्रीनगरमध्ये जीएसटी कौन्सिलची बैठक आयोजित केली आहे. कोणत्या वस्तू कर रचनेत येतील याचा निर्णय या बैठकीत होणार आहे. राज्याचा अर्थ मंत्री म्हणून तेथे उपस्थित राहणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.यावर अधिक वाचा :