testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जीएसटीसाठी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात खास सोहळा

Last Modified शुक्रवार, 30 जून 2017 (12:55 IST)

केंद्र सरकारनंही
जीएसटीसाठी

जोरदार तयारी केली आहे.
स्वातंत्र्यानंतरची पहिली कर सुधारणा अंमलात आणण्यासाठी काऊंटडाऊन सुरु झालं आहे.
1 जुलै जीएसटी लागू होणार आहे.

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, काही माजी पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. मात्र, काँग्रेसनं या ऐतिहासिक सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये रात्री 11 वाजता जीएसटी लागू करण्यासाठी एक कार्यक्रम सुरु होणार आहे. रात्री 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत सुरु राहणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. यानंतर 12 वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे देशात जीएसटी लागू झाल्याची घोषणा करतील.यावर अधिक वाचा :