मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2017 (09:16 IST)

वस्तूंवर नव्या किंमतीसह स्टीकर लावून विक्री शक्य

जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादकांना वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीद्वारे जुन्या व नव्या किंमतीची माहिती देणं गरजेचं असणार आहे असं महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितलं. जीएसटीनंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. शिवाय वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीवर सरकारची करडी नजर असणार आहे हे स्पष्ट केलं.  वस्तूवरील छापील किंमत म्हणजे MRP मध्ये जीएसटीनंतर बदल होईल,  त्याबाबत उत्पादकांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात द्यावी. वस्तूवरील छापील किंमत म्हणजे MRP मध्ये सर्व प्रकारच्या करांचा समावेश असतो त्यावर पुन्हा जीएसटी स्लॅबप्रमाणे कर लावला तर ती वस्तू आणखी महाग होईल. त्यामुळे व्यापारी वस्तूंवर नव्या किंमतीसह स्टीकर लावून विक्री करु शकतात, असंही सरकारने स्पष्ट केलं.