Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

एचडीएफसी बॅंकेच्या नफ्यात वाढ

नवी दिल्ली| Last Modified शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (16:21 IST)
एचडीएफसी बॅंक, एशियन पेन्ट्‌सने सप्टेंबर तिमाहीचा निकाल प्रसिद्ध केला असून या कंपन्यांनी चांगली कामगिरी केली. एचडीएफसी बॅंकेच्या नक्‍त नफ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 20 टक्क्‌यांनी वाढ होत 4,151 कोटी रुपयांवर पोहोचला. बुडीत कर्जासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या निधीव्यतिरिक्त नफ्यात वाढ झाली आहे. बॅंकेच्या अनुत्पादित कर्जातही वाढ नोंदविण्यात आली आहे. तिमाहीच्या आधारे अनुत्पादित कर्ज 1.24 टक्‍क्‍यांवरून 1.26 टक्‍क्‍यांवर पोहोचले. बॅंकेचे व्याज उत्पन्न 22 टक्‍क्‍यांनी वाढत 9,752 कोटीवर पोहोचले. एशियन पेन्ट्‌सच्या नफ्यातही मोठी वाढ झाली आहे.


यावर अधिक वाचा :