testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

२०२८ पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था...

भारताची अर्थव्यवस्था २०२८ सालापर्यंत जपानला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असे बँक ऑफ अमेरिका या अमेरिकी ब्रोकरेज संस्थेने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे. ‘इंडिया २०२८ : द लास्ट ब्रिक इन द वॉल’ असे या अहवालाचे शीर्षक आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेने यापूर्वीच ब्राझिल आणि रशियाला मागे टाकले असून ती आता चीनच्या पाठोपाठ ‘ब्रिक्स’ देशांमधील (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. यानंतर भारत २०१९ पर्यंत फ्रान्स आणि ब्रिटनला मागे टाकून अमेरिका, चीन, जपान व जर्मनीच्या पाठोपाठ जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली असेल. तर २०२८ पर्यंत जर्मनी आणि जपानलाही मागे टाकून भारत तिसऱ्या क्रमांकावर आला असेल, असे बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने अहवालात म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :