शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 6 मार्च 2017 (00:30 IST)

देशसोडून पळालेल्या पाखंडी माल्याचा तिसरया वेळी बंगला होणार लिलाव

गोव्यातील विजय मल्ल्या यांचा ‘किंगफिशर व्हिला’ चा  तिसर्‍यांदा लिलाव होत आहे. भारतीय स्टेट बँकने या बंगल्याची न्यूनतम राखीव किंमत 73 कोटी रुपये ठेवली आहे. 
 
मल्ल्या यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयडिबीआय, बँक ऑफ बडोदा, अलहाबाद बँक,  फेडरल बँकेसह देशातील सुमारे 17 विविध बँकाकडून 9 हजार कोटींचे कर्ज घेतले होते. कर्ज घेताना मल्ल्या यांच्या मालकीची  ‘किंगफिशर एअरलाईन्स’ आणि ‘युनायटेड ब्रिवरेजीस’ या दोन्ही कंपन्या सदर बँकाकडे तारण ठेवल्या . मल्ल्या यांनी देणे थकवले­ल्या सर्व बँकांनी ‘एसबीआयकॅप ट्रस्टी कंपनी’ला मल्ल्याच्या कांदोळीच्या बंगल्याचा लिलाव करण्याचा अधिकार दिला .मल्ल्या यांनी कर्ज बुडवल्यानंतर आजपर्यंत मार्च आणि ऑक्टोबर 2016मध्ये दोन वेळा त्यांच्या मालमत्तेच्या झालेल्‍या लिलावाला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता पुन्हा एकदा बँक आपली कर्जवसुली साठी हा लिलाव ठेवला आहे. जर हा लिलाव झाला तर खूप नाही तर काही प्रमाणात कर्ज वसुली होणार आहे.