शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: फरिदाबाद (हरियाणा) , शुक्रवार, 23 मार्च 2018 (11:12 IST)

मोबाइल-आधार जोडताना एकदाच अंगठा लावा

मोबाइल नंबर आधारशी जोडत असाल तर सावध राहा. आधार जोडणीवेळी स्कॅन करताना आपल्या अंगठ्याचा ठसा एकदाच द्या, दुसर्‍यांदा स्कॅन कराल तर अडचणीत याल. कारण मोबाइल जोडणीवेळी कार्डधारकाच्या नावावर नवीन सीम घेऊन गुन्हे घडत असल्याचे समोर आले आहे.
 
मोबाइल प्रमाणेच पेटीएममार्फत पेमेंट करतानाही काळजी घ्या. पेटीएमद्वारे पेमेंट केल्यावर संबंधित व्यक्तीला पेमेंट मिळत नाही ज्याला आपण ते पाठवले आहे. अशावेळी बहुतेक जण इंटरनेटवर साइट सर्च करतात आणि हेल्पलाइन क्रमांकावर फोन करतात.