मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 9 नोव्हेंबर 2017 (10:25 IST)

मोबाईल क्रमांक आधारशी जोडला नाही तरी बंद होणार नाही

मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाहीये. त्यामुळे मोबाईल क्रमांक आधारशी न जोडल्यास बंद होणार नाही, असं स्पष्टीकरण दूरसंचार विभागानं दिलं आहे. आधारशी लिंक न केल्याच्या कारणास्तव मोबाईल कंपन्यांना कोणाचेही मोबाईल नंबर बंद करता येणार नाही, अशी माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे.


मोबाईल नंबर आधारला जोडण्याच्या केंद्राच्या सक्तीविरोधात अनेक ग्राहकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या असून, हा निर्णय न्यायालयात आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. त्यामुळे मोबाईल नंबर आधारशी लिंक न केल्याच्या  कारणास्तव ग्राहकांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही, असं दूरसंचार विभागाच्या सचिव अरुणा सुंदराजन यांनी सांगितले आहे.