गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

फोर्ब्सच्या यादीत अंबानी अव्वल

नवी दिल्ली- रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी यांनी फोर्ब्स 'वर्ल्ड गेंमचेंजर' यादीत अव्वल स्थान पटाकवले आहे. जगातील 25 जणांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी अव्वल ठरले आहेत.
 
लाखो लोकाच्या आयुष्यात बदल केल्याबद्दल आणि आपल्या क्षेत्रात बदल केलेल्या व्यक्तींचा समावेश 'वर्ल्ड गेंमचेंजर' यादी करण्यात आला आहे. अंबानींनी 'जिओ'च्या माध्यमातून भारतात इंटरनेट क्रांती केलीच शिवाय लाखो सामान्य नागरिकांपर्यंत इंटरनेट सुविधा पोहचवली असल्याचा उल्लेख फोर्ब्सने केला आहे. याशिवाय जियोच्या लॉन्चिंगपासून इतर कंपन्यांमध्ये धास्ती पसरली आणि मोठ्या स्पर्धेला सुरूवात झाली. मागील सहा महिन्यात जिओने सुमारे 10 कोटी ग्राहक जोडले. जिओच्या स्वस्त इंटरनेट सर्व्हिसमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांनादेखील आपल्या धोरणात बदल करावा लागला असंही फोर्ब्सनं म्हटलं आहे.
 
मुकेश अंबानी यांच्याशिवाय या यादीत 'डायसन' कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन, सौदी अरबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, आफ्रिकेतील रिटेल टायकॉन क्रिस्टो वीजे आणि अमेरिकन ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन ब्लॅक रॉकचे संस्थापक लॅरी फिंक आदींचा समावेश आहे.