Widgets Magazine

आरबीआयकडून 500 रुपयांची नवी नोट जारी

मुंबई|


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 रुपयांची नवी नोट जारी केली आहे. या नव्या नोटा महात्मा गांधी सीरिजमधील आहेत.

500 रुपयांच्या नव्या नोटांच्या इन्सेटमध्ये इंग्लिशचं ए (A) अक्षर लिहिलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असलेल्या दोन्ही नंबर पॅनलवर हे अक्षर छापलेलं आहे.
नोटांच्या छपाईचं वर्ष 2017 आहे. या नोटांचे इतर फीचर्स हे नोटाबंदीनंतर जारी केलेल्या नोटांप्रमाणेच आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर हॅण्डलवरही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. इन्सेटमध्ये A लिहिलेल्या 500 रुपयांच्या नोटा जारी, असं ट्वीटमध्ये लिहिलं आहे.यावर अधिक वाचा :