Widgets Magazine
Widgets Magazine

नोकिया 3310 सुप्रीमो पुतिन, किंमत तब्बल 1 लाख 13 हजार 200 रुपये

बुधवार, 8 मार्च 2017 (09:52 IST)

फेब्रुवारीमध्ये नोकिया 3310 हा सर्वाधिक लोकप्रिय फोन पुन्हा रिलॉन्च केला. भारतासह अनेक देशांमध्ये या फोनची प्रतिक्षा आहे. भारतात या फोनची किंमत साडे तीन हजार रुपये आहे. मात्र रशियामध्ये हा फोन यूनिक पद्धतीत मिळणार आहे. रशियाची प्रिमियम स्मार्टफोन मेकर कंपनी ‘कॅव्हियर’ने नोकिया 3310 चं रिस्टाईल व्हर्जन तयार केलं आहे. या मॉडेलचं नाव असं आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोसह हा फोन बनला असून फोनवर रशियाच्या राष्ट्रगीताची एक ओळही लिहिण्यात आली आहे. या फोनची किंमत तब्बल 1 लाख 13 हजार 200 रुपये ठेवण्यात आली आहे.नोकियाचा रशियामधील हा फोन ड्युअल गोल्ड कोटेड आणि ड्युअल इलेट्रोप्लेटेड टेक्नोलॉजीसह येणार आहे.
 
नोकिया 3310 मध्ये 2.4 इंचाची कव्हर्ड स्क्रीन आणि बटन असलेला की-बोर्ड असणार आहे. 2 मेगापिक्सलचा फ्लॅश लाईट कॅमेरा, हेडफोन, ड्युअल सिम, एफएम रेडियो, 16 एमबी इंटरनल स्टोरेज क्षमता जी 32 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या मोबाईलची बॅटरी 1200 mAh क्षमतेची आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

संघटीतपणे प्रयत्न केले तरच आर्थिक संकट टळेल: संजीव कुमार

वर्षभरात महावितरणची जवळपास चार हजार कोटी रुपयांची वीज चोरी होत आहे. तर दुसरीकडे ...

news

देशसोडून पळालेल्या पाखंडी माल्याचा तिसरया वेळी बंगला होणार लिलाव

गोव्यातील विजय मल्ल्या यांचा ‘किंगफिशर व्हिला’ चा तिसर्‍यांदा लिलाव होत आहे. भारतीय ...

news

यापुढे एसबीआयमध्ये अकाऊंटमध्ये निर्धारित किमान बॅलन्स राखणे अनिवार्य

स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये अकाऊंटमध्ये निर्धारित किमान बॅलन्स राखणे ...

news

अमूल दुधाच्या दरात प्रति लीटर दोन रुपयांची वाढ

गुजरात कोऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) अमूल दुधाच्या दरामध्ये आजपासून ...

Widgets Magazine