बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

देशात इस्लामिक बँक सुरु करणार नाही

देशात इस्लामिक बँक सुरु करणार नाही, असा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. माहिती अधिकारातंर्गत दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना आरबीआयनं हे स्पष्टीकरण दिलं आहे.
 
इस्लामिक किंवा शरिया बँक व्याज आकारत नाही. कारण व्याज घेणे इस्लाममध्ये हराम आहे. दरम्यान भारतात सर्व नागरिकांना बँकिंग आणि वित्तीय सेवा समान स्वरुपात मिळाल्या पाहिजेत, असं आरबीआयचं धोरण आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.
 
“बँकिंग व्यवस्था आणि सर्व वित्तीय सेवा सर्वांसाठी समसमान असयाला हव्यात. यावर अधिक विचार केल्यानंतरच इस्लामिक बँकिंग सुरु करण्याच्या प्रस्तावावर पुढे कोणतीच पावलं न उचलण्याचा निर्णय घेतला आहे.”, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.