गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 5 डिसेंबर 2016 (12:20 IST)

आता 50 आणि 20 रुपयांचे नवीन नोटा, जुन्या नोटाही चलनात

पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटांपाठोपाठ आता लवकरच २०, ५० च्या नव्या नोटा चलनात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नव्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कुणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण जुन्या २०, ५० च्या नोटा देखील चलनात राहणार आहेत.
 
या दोन्ही नोटांच्या पॅनलमध्ये इनसेट लेटर राहणार नाही. 'एल' या इंग्रजी अक्षरांच्या सिरीजने या नोटांचा नंबर सुरु होणार असल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. आधीच चलनबंदीमुळे सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याने २० आणि ५० रुपयांच्या जुन्या नोटा कायम ठेवण्याचा आरबीआयने निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. सुट्ट्या पैशांची चणचण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या कमी मुल्यांच्या नव्या नोटांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.२० च्या नवीन नोटा चलनात येतील. त्यावर दोन्ही बाजूंनी ‘L’ अक्षर असेल. तसेच जुन्या २०, ५० च्या नोटादेखील चलनात राहतील असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
 
पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मात्र जुन्या नोटाही चलनात राहणार असल्यामुळे नागरिकांनी कसलीही काळजी करण्याची गरज नाही, असे आरबीआयने म्हटले आहे.