Widgets Magazine
Widgets Magazine

अर्थ मंत्रालयाकडून तब्बल 11 लाख पॅन कार्ड रद्द

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:35 IST)

अर्थ मंत्रालयाने तब्बल 11 लाख 44 हजार पॅन कार्ड म्हणजेच पर्मनंट अकाऊंट नंबर रद्द केले आहेत. पॅन कार्ड हे प्रत्येकाचं आर्थिक ओळखपत्र आहे. बँकेसह अनेक आर्थिक व्यवहार पॅन कार्डशिवाय होत नाहीत. मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर दोन पॅन कार्ड असल्याचं आढळून आल्यानंतर अर्थ मंत्रालयाने पॅन कार्ड रद्द केले आहेत.

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 27 जुलै 2017 पर्यंत एकच व्यक्ती किंवा संस्थेकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आढळून आल्याने एकूण 11 लाख 44 हजार 211 पॅन कार्ड रद्द करण्यात आले. एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवणं कायदेशीर गुन्हा आहे. मात्र कर वाचवण्यासाठी अनेक जण एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवतात. त्यामुळेच सरकारने आता पॅन कार्ड आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

'फ्रीडम टू फ्लाय' ची ऑफर, अवघ्या 799 विमान प्रवास

जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आता टाटा-एसआयए यांच्या संयुक्त ...

news

2000च्या नोटा आता जास्त का दिसत नाहीत?

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांत असलेले भारतीय चलनाचे 86 टक्के मूल्य एका दिवसांत (आठ ...

news

कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, भाव वाढले

परराज्यातून कांद्याची अचानक मागणी वाढल्याने मंगळवारच्या तुलनेत ११०० रुपयांची दोन दिवसात ...

news

टोमॅटो : भाववाढीचा ग्राऊंड रिपोर्ट

कर्नाटक,हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र,गुजरात या राज्यात झालेल्या अतिवृष्टिने टोमॅटोचे नुकसान ...

Widgets Magazine