Widgets Magazine
Widgets Magazine

पाच शहरात रोज बदलणार पेट्रोल- डिझेलचे भाव

petrol

येत्या 1 मे पासून पेट्रोल, डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार दररोज बदलणार असून प्राथमिक स्तरावर देशातील पाच शहरात हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. पुडुचेरी, उदयपूरल जमशेदरपूर, चंदीगड आणि आंध्र प्रदेशातील विझाग या शहरांमध्ये ही योजना राबवण्यात येणार असून ती यशस्वी ठरल्यास ती देशभरात लागू होईल.
 
सध्या देशात दर पंधरवड्याला पेट्रोल- डिझेलचे भाव बदलतात, मात्र सरकारी तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजाररभावानुसार दररोज पेट्रोल- डिझेलच्या भावात बदल करण्याच्या विचारात आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पोट्रोलियमचे देशातील 95 टक्के किरकोळ इंधन बाजारावर वर्चस्व आहे. या कंपन्या हे दररोजचे दर ठरवण्यासाठी कोणत्या प्रक्रिया राबवण्यात येतील, त्याचा अभ्यास करत आहेत.
 
पेट्रोल- डिझलचे दररोजचे दर कसे ठरवायचे याबाबत चर्चा करण्यासाठी या कंपन्यांच्या अधिकार्‍यांनी नुकतीच पेट्रोलियम मंत्रालयाचा अन्य अधिकार्‍यांची भेट घेतली होती.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

पुन्हा एकदा अनेक एटीएम झाली रिकामी

राज्यात मुंबई आणि पुणे शहरासह अनेक ठिकाणी एटीएम गेल्या तीन-चार दिवसांपासून रिकामे आहेत. ...

news

आता पेट्रोल पंप रविवारी बंद

कमिशन वाढवून देण्याबद्दल सरकारकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पेट्रोल ...

news

पॅन कार्डला आधार कार्डशी जोडणे अनिवार्य

पॅन कार्डला आधार कार्डशी संलग्न करण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र ...

news

भट्टाचार्य यांच्या कर्जमाफीच्या वक्तव्याचे एमआयएमकडून समर्थन

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या ...

Widgets Magazine