Widgets Magazine

रविवारी बंद राहणार नाही पेट्रोल पंप

Last Modified गुरूवार, 20 एप्रिल 2017 (12:08 IST)
पेट्रोलियम मंत्रालयाने देशातील आठ राज्यांचे दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाची नाराजगी बघत मोठ्या वितरकांनी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या निर्णयाच्या एक दिवसानंतर पेट्रोलियम मंत्रालयाच्या ट्विटला रिट्वीट करत पेट्रोल पंप डिलर्सच्या या निर्णयावर आपत्ती घेतली आणि म्हटले की याने लोकांना त्रास सहन करावा लागेल. त्यांनी म्हटले की पंतप्रधान मोदींनी मन की बात यात देशातील नागरिकांना आठवड्यातून एक दिवस इंधन न वापरण्याची अपील केली होती. ही अपील डीलर्ससाठी नव्हती.
मंत्रालयाने स्पष्ट केले की त्यांनी प्रमुख डीलर्स फेडरेशनशी चर्चा केली आहे. त्यांनी पेट्रोल पंप बंद व्हायला नको असे स्पष्ट केले आहे. आठवड्यातून एक दिवस पेट्रोल पंप बंद ठेवल्याने सामान्य लोकांना त्रास सोसावा लागेल असे आणखी एक ट्विट मंत्रालयाने केले.


यावर अधिक वाचा :