शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (10:18 IST)

आरबीआयकडून कर्जदारांना दिलासा, कर्ज परत फेडीसाठी ६० दिवसांची अतिरिक्त मुदत वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कर्जदारांना दिलासा दिला आहे. यात कार,  घर तसेच अन्य कारणासाठी बँकाकडून १ कोटीपर्यंत कर्ज घेतलेल्या कर्जदारांना कर्ज परत फेडीसाठी आरबीआयने ६० दिवसांची अतिरिक्त मुदत वाढ दिली आहे. या निर्णयामुळे गृह कर्जासह शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना देखील दिलासा मिळला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे १ नोव्हेबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान कर्जाचा हप्ता भरण्यास दिरंगाई झाल्याच्या कारणावरुन थकबाकीदाराचा शिक्का कर्जदारावर बसणार नाही. देशातील आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने याबाबतचा निर्णय घेतला आहे.