गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

बिलात सेवाकर दाखवणे बंधनकारक

हाॅटेल बिलमध्ये कोणत्याही ग्राहकाला त्याच्या सेवाकर आकारला असल्यास त्याची माहिती देण्यात यावी असं  मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आलं आहे. तर त्यासाठी त्यांनी  9987555665 या व्हाॅट्स अॅप नंबरवर आपल्या बिलाचा फोटो पाठवण्यात यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.त्यामुळे  सेवाकर लपवून बिल देत असलेल्या हॉटेल चालकावर कारवाई होणे शक्य होणार आहे. तर या करिता २३ जानेवारीपर्यंत ही माहिती देण्याचं आवाहन पंचायतीतर्फे करण्यात आल आहे.

या विषयासंदर्भात ग्राहक पंचायत एक सर्व्हेक्षण करून अभ्यास करत अाहे, त्याकरता ही माहिती मागवण्यात येत असल्याचं पंचायतीने स्पष्ट केलं. जर यामध्ये बनवाबनवी केली तर भविष्यात हॉटेल चालकाला फार मोठय प्रमाणत दंड आणि शिक्षा होवू शकते.