Widgets Magazine
Widgets Magazine

यापुढे एसबीआयमध्ये अकाऊंटमध्ये निर्धारित किमान बॅलन्स राखणे अनिवार्य

स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये अकाऊंटमध्ये
निर्धारित किमान बॅलन्स राखणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा बॅलन्स विविध ठिकाणी वेगवेगळा ठरविला आहे. 1 एप्रिलपासून हे नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. यात
Widgets Magazine
मेट्रो शहरांत किमान बॅलन्स 5000 रुपये निर्धारित केलाय तर शहरी भागात किमान बॅलन्स 3000 रुपये आहे. अर्ध-शहरी भागात ही मर्यादा 2000 रुपये तर ग्रामीण भागांत 1000 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. या निर्धारित करण्यात आलेल्या बॅलन्सहून कमी बॅलन्स जर तुमच्या अकाऊंटमध्ये असेल तर 1 एप्रिलपासून तुम्हाला दंड बसणार आहे. जर मेट्रो शहरांत जर किमान बॅलन्स 75 टक्‍क्‍यांहून कमी असेल तर सर्व्हिस टॅक्‍ससोबत 100 रुपयांचा दंड असेल. किमान बॅलन्स 50-75 टक्‍क्‍यांदरम्यान असेल तर सर्व्हिस टॅक्‍ससोबत 75 रुपयांचा फाईन असेल तर 50 टक्‍क्‍यांहून कमी बॅलन्स उरला तर सर्व्हिस टॅक्‍ससोबत 50 रुपयांचा दंड भरावा लागेल. तर ग्रामीण भागांत किमान बॅलन्स न राखल्यास सर्व्हिस टॅक्‍सवर 20 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. याचबरोबर एसबीआय शाखेमध्ये एका महिन्यात तीन कॅश ट्रान्झक्‍शननंतर केल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रान्झक्‍शनवर 50 रुपयांचा दंडही आकारला जाईल.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :