testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भट्टाचार्य यांच्या कर्जमाफीच्या वक्तव्याचे एमआयएमकडून समर्थन

Last Modified रविवार, 9 एप्रिल 2017 (20:35 IST)
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचेही एमआयएमने समर्थन केले. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला आमचा विरोध आहे. सरसकट कर्जमाफीने धनदांडग्या शेतकऱ्यांचा फायदा होतो, अशी भूमिका एमआयएमने घेतली आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी याबाबत औरंगाबादमध्ये
पत्रकार परिषदेत माहिती दिली. या भूमिकेमुळेच आम्ही विरोधी पक्षांच्या संघर्षयात्रेत सहभागी झालो नाही असे स्पष्टीकरणही यावेळी जलील यांनी दिले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र विरोधी पक्षांचे सर्व आमदार संघर्षयात्रेतही सहभागी नव्हते आणि सभागृहातही हजर नव्हते, अशी टीकाही इम्तियाज जलील यांनी केली.


यावर अधिक वाचा :