Widgets Magazine
Widgets Magazine

GSTचा प्रभाव : टाटाच्या गाड्या 12 टक्के, रेनॉ च्या 7% टक्के स्वस्त

नवी दिल्ली, गुरूवार, 6 जुलै 2017 (09:15 IST)

तुम्ही टाटा कंपनीची गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांच्या किंमती तब्बल 12 टक्‍क्‍यांपर्यंत घटवल्या आहेत.
 
टाटाच्या कारमध्ये 3 हजार 300 पासून ते 2 लाख 17 हजारांपर्यंत घट करण्यात आली आहे. गाड्यांचे मॉडेल्स आणि पेट्रोल-डिझेल प्रकारानुसार ही सूट दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 1 जुलैपासून देशात जीएसटी ही नवी करप्रणाली लागू झाली. त्यानंतर सर्वच क्षेत्रावर या करप्रणालीचा परिणाम पाहायला मिळाला. नव्या करांमुळे अनेक कंपन्यांनी आपापल्या वस्तूंचे दर कमी-जास्त केले. ऑटोमोबाईल क्षेत्रात मारुती सुझुकी, फोर्ड आणि होंडा या कंपन्यांनंतर आता टाटा मोटर्सनेही आपल्या गाड्यांच्या किंमती घटवल्या आहेत. जून 2017 मध्ये टाटा मोटर्सच्या गाड्यांच्या विक्रीत 5 टक्‍क्‍यांनी घट झाली होती. त्यामुळे आता गाड्यांच्या किंमती कमी झाल्यानंतर विक्रीत वाढ होण्याची आशा कंपनीकडून व्यक्त केली जात आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

वस्तूंवर नव्या किंमतीसह स्टीकर लावून विक्री शक्य

जीएसटीनंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. शिवाय वस्तूंच्या खरेदी आणि ...

news

एसएमएस दाखवा, वीजबील भरा

वीज बिलाबाबत महावितरणच्यावतीने ग्राहकांना मोबाईलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर ...

news

घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले

जीएसटी लागू होताच घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहे. आता एलपीजी सिलेंडरसाठी 32 रुपये ...

news

जीएसटीसाठी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात खास सोहळा

केंद्र सरकारनंही जीएसटीसाठी जोरदार तयारी केली आहे. स्वातंत्र्यानंतरची पहिली कर सुधारणा ...

Widgets Magazine